म्हणूनच स्टार्टअपच्या अनिश्चिततेला सामोरे जाण्याचे 5 मार्ग खाली आहेत:
1. सकाळचा नित्यक्रम नेटाने पाळा
सकाळची दिनचर्या सुरू करण्याचे अनेक मार्ग आहेत. एक स्थिर आणि रोज नित्याने करता येण्याजोगी दिनचर्या असणे महत्त्वाचे आहे. ही दिनचर्या तुमचे मन केंद्रित करते आणि तुम्हाला तुमच्या दिवसासाठी आनंदी राहण्यास मदत करते. ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय व्यवस्थापित करू शकता आणि तुम्हाला हवे ते करू शकता. जेव्हा व्यवसाय स्वतःचा असतो तेव्हा कोणीही तुमचा बॉस नाही आणि कोणीही तुम्हाला काय करावे हे सांगत नाही. त्यामुळे दिवसाची सुरवात पूर्णक्षमतेने करणे हे उत्पादनक्षम ते पूर्णपणे गोंधळलेल्या दिवसांचे मिश्रण हाताळण्यास मदत करते. यामुळे तुम्ही स्वत:ला थोडी स्थिरता देऊ शकता. मनाच्या त्या शांत स्टेज वर पोहचण्यासाठी ध्यानाची गरज आहे.
2. उच्च कार्यक्षमता असलेल्या पुस्तकांसाठी वेळ काढा
प्रत्येकाला आयुष्यात पुढं जाण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते. उद्योजकांना ती थोड्या जास्त प्रमाणात लागते. इतर व्यावसायिकांसोबत बोला, त्यांना पुस्तकांविषयी विचारा. अशी पुस्तके वाचणे हे तुमच्या मानसिकतेसाठी आणि तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीसाठी अविश्वसनीय गोष्ट ठरेल. बरीच पुस्तके हि तुम्हाला उद्दिष्टांसाठी उत्साहित आणि प्रोत्साहित ठेवतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एखाद्याच्या प्रवासातील त्रास, तो सहन करण्याची क्षमता ऐकून आणि त्याने संकटांवर ज्या प्रमाणे मात केली हे ऐकून आणखी ऊर्जा मिळाल्यासारखे वाटेल.
3. तुमच्या आठवड्याचं कामकाज शेड्युल करा
ऑफिस जॉब करता असताना आठवड्याचं कामकाज शेड्युल केलेलं असतं. कंपनीतील प्रत्येकजण एका किंवा दुसर्या मीटिंगसाठी तुमचा वेळ मागत असताना दिसतो. निरर्थक बैठका हे देखील काही लोकांचे नोकर्या सोडण्याचे कारण आहे. तुमची स्वतःची स्टार्टअप असल्यावर या निरर्थक मिटिंग संपून जातील. यामुळे कॅलेंडर कसे भरायचे हे तुमच्या हातात असेल. रविवारची संध्याकाळ हि तुमच्या आठवड्याच्या मिटिंग ठरवण्यासाठी असावी. आठवड्याभरात दररोज मोठ्या कामांचे नियोजन करा. अशा प्रकारे काम केल्यास तुम्ही नेहमी जागरूक असता की तुम्ही कशावर काम केले पाहिजे आणि तुम्ही ट्रॅकवर रहता.
4. व्यायामशाळेत जा
हा खरोखर एक अत्यंत असा योग्य सकाळच्या नित्यक्रमाचा भाग आहे आणि त्याचे फायदे भरपूर आहेत. व्यायामामुळे चिंता आणि तणाव दूर होण्यास मदत होते. तुमच्या व्यवसायातील निराशा दूर करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग नाही. तुम्ही दररोज व्यायाम केल्यावर तुमचे शरीर आणि मन अधिक आरामशीर होईल. जेव्हा उद्योजक होण्याच्या तणावाचा प्रश्न येतो तेव्हा व्यायाम हि एक गरज आहे. यामुळे तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहता.
5. कृतज्ञ व्हा
कृतज्ञता ही एक चांगली गोष्ट आहे. कृतज्ञतेची भावना हि नेहमी माणसाला नम्र ठेवते. तसेच व्यवसाय वाढत असताना होणाऱ्या वेदना, मनाची चलबिचल यावर आराम मिळवण्याचा सर्वात जलद मार्ग आहे. कृतज्ञतेमुळे शंका आणि अनिश्चितता वेदनांमधून जात असताना किंवा काही चुकीचे होत आहे असे दिसते तेव्हा अनेक गोष्टीतून मार्ग निघतो.
कृतज्ञता माणसाला प्रगतीच्या नव्या मार्गाला घेऊन जाते. कृतज्ञतेमुळे अनेक माणसे जोडली जातात. ज्याचा तुमच्या व्यवसायामध्ये खूप फायदा होतो. त्यामुळं मानसिक तणावापासून लांब राहून माणसं जोडण्यासाठी नेहमी कृतज्ञ असावं.